Type Here to Get Search Results !

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत स्कॉलर्स इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी


 मारेगाव : 


       येथील स्कॉलर्स इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विविध गटांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल १५ विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे.


        १४ वर्षांखालील मुलींच्या गटात साची तुराणकर, लावण्या भोगेकर, श्रेया बोढे, काव्या ठाकरे व अलीझा पठाण यांनी उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले. तसेच १७ वर्षांखालील मुलींच्या गटात मनश्री डाखरे, लावण्या मोघे, जान्हवी भोंडेकर, आनंदी घागी व श्रावणी बुच्चे यांनी दमदार कामगिरी केली. तसेच १७ वर्षांखालील मुलांच्या गटात तेजवंत झाडे, अंश सुराणा, लौकीक सुराणा, अबिर पठाण व निल चिंचुलकर यांनी उल्लेखनीय यश मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली.


       विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांचे क्रीडा मार्गदर्शक अविष्कार फरताडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सातत्यपूर्ण सरावाचे योगदान आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य मनु नायर, संस्थापक, शिक्षकवृंद व पालकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image