Type Here to Get Search Results !

वणी पोलिसांनी आखला ‘गेम’; कुख्यात गुंड तीन महिन्यांसाठी बाहेर


 वणी : 

         वणी पोलीस ठाण्याच्या गुन्हे अभिलेखावरील कुख्यात आरोपी मोहम्मद जमील उर्फ मौलाभाई शेख एनल्हक (वय २३, रा. राजूर कॉलरी, ता. वणी, जि. यवतमाळ) याच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होण्याची शक्यता तसेच समाजात दहशतीचे वातावरण निर्माण होत असल्याने त्याच्यावर तडीपारची कारवाई करण्यात आली.


       सध्या सार्वजनिक सण-उत्सवांचे कार्यक्रम सुरू असून, या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि सार्वजनिक शांतता अबाधित राहावी, यासाठी वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांनी मोहम्मद जमील उर्फ मौलाभाई शेख एनल्हक याच्याविरुद्ध तडीपार प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी, वणी यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर २ ऑक्टोबर २०२६ रोजी मोहम्मद जमील उर्फ मौलाभाई शेख एनल्हक याला वणी व मारेगाव तालुक्यांच्या हद्दीतून तीन महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले.


      ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे आणि वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image