Type Here to Get Search Results !

लायन्स क्लब व लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट वणी द्वारे रुग्णोपयोगी साहित्याचे लोकार्पण


 वणी :        


       लायन्स क्लब व वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट द्वारे शवपेटीसह अन्य दहा प्रकारच्या रुग्णोपयोगी साहित्याचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. साहित्यात फोल्डर बेड, कमोड चेयर,व्हिल चेअर,कुबड्या, फोल्डर वॉकर, आय वी स्टॅन्ड, वॉकिंग स्टिक, ऑक्सिजन मशीन,एअर बेड,सेमी फोल्डर बेड यांचा समावेश आहे. हे सर्व साहित्य नाममात्र शुल्क घेऊन जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असणार आहे. सर्जिकल बँक द्वारे उपलब्ध साहित्याच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम लायन्स इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या देशमुखवाडी शाळेच्या सभागृहात पार पडला. 


       याप्रसंगी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे सन्माननीय अध्यक्ष मा. संजीवरेड्डी बोदकुरवार, उपाध्यक्ष लायन बलदेवजी खुंगर, कोषाध्यक्ष लायन चंद्रकांतजी जोबनपुत्रा तसेच लायन क्लबचे सन्माननीय अध्यक्ष लायन तुषार नगरवाला,उपाध्यक्ष लायन महेंद्र श्रीवास्तव व लायन डॉ. विजय राठोड, सचिव लायन प्रा.डॉ. अभिजीत अणे,कोषाध्यक्ष लायन नंदलाल शुगवाणी व चार्टर्ड मेंबर लायन प्रमोद देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते.

 

        वणीकरांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असा हा संवेदनशील उपक्रम लायन्स क्लब व लायन्स चॅरिटेबल ट्रस्टची समाजाप्रती असलेली बांधिलकी दर्शविणारा आहे. याप्रसंगी ट्रस्ट व क्लबच्या अध्यक्षांची समयोचित भाषणे झाली. त्यात वणीकरांनी या उपलब्ध सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. 


         कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपाध्यक्ष लायन डॉ.विजय राठोड तर संचालन श्री. किरण बुजोणे यांनी केले. कार्यक्रमास माजी अध्यक्ष लायन शमीम अहमद, लायन डॉ के. आर. लाल, लायन शांतीलाल पांडे, लायन किशन चौधरी, भिकमचंद गोयनका, संजीव चिंतलवार, ओंकार देशपांडे, यश श्रीवास्तव यांसह सदस्या लायन ज्योती नगरवाला, ललीता बोदकुरवार, सुनिता खुंगर, खुशी नगरवाला, मधुलीका खुंगर अन्य लायन सदस्य, अकॅडमीक डायरेक्टर प्रशांत गोडे, प्राचार्या सौ. चित्रा देशपांडे व शहरातील गणमान्य नागरिक व बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

       कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image