श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित), चिखलगाव, वणी, जि. यवतमाळ यांच्या वतीने पंचशील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नांदपेरा येथे सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धन व पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. माधुरी शंकरराव खामनकर यांच्या प्रेरणेने करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री नारायणरावजी मांडवकर उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रचारकार्याशी जोडलेले तसेच वृक्षप्रेमी म्हणून कार्य करणाऱ्या मांडवकर यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगितले.
कार्यक्रमासाठी पंचशील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. पाटील सर, प्राध्यापकवृंद व कर्मचारीवृंद यांनी सहकार्य केले. यावेळी सेवेकरी बंधू श्री प्रदीप बोबडे, श्री मनीष खानझोडे, श्री सफल गव्हाणे, श्री वैभव ताजणे, श्री मारुती पारखी, श्री गणेश शेगर, श्री हेमंत एकरे, श्री संजय सिडाम तसेच सौ. वनिता सिडाम यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
वृक्षारोपणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेऊन वृक्षांचे जतन व संवर्धन करावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.

