Type Here to Get Search Results !

गरब्याच्या तालावर वणीकर थिरकणार, मनसे गरबा महोत्सवाच्या प्रशिक्षणाला सुरुवात


 वणी  :


            महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या बहुचर्चित ‘मनसे गरबा महोत्सवा’च्या नृत्य प्रशिक्षणाला आजपासून उत्साहात सुरुवात झाली. प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने शेतकरी मंदिर सभागृहात तरुणाई व महिला वर्गामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

              शहरातील शेतकरी मंदिर सभागृहात सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत गरबा नृत्याचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. या प्रशिक्षणामध्ये स्पर्धकांना गरब्याची योग्य लय, ताल तसेच पारंपरिक आणि आधुनिक नृत्याच्या विविध स्टेप्स शिकविण्यात येत आहेत. त्यामुळे स्पर्धकांना मुख्य गरबा महोत्सवासाठी उत्तम तयारी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

            वणी विधानसभा क्षेत्रात मनसेच्या गरबा महोत्सवाला दरवर्षी मोठी लोकप्रियता मिळत असून, यंदाच्या महोत्सवाबाबतही गरबाप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. महोत्सवाच्या मुख्य सोहळ्यासह बक्षीस वितरण कार्यक्रमाला नामांकित सिनेतारकांची विशेष उपस्थिती राहणार असल्याने यंदाचा महोत्सव अधिक आकर्षक ठरणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

           प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाल्याने कार्यक्रमस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या प्रशिक्षणामुळे वणी शहरात आतापासूनच गरब्याची रंगत वाढली आहे.

         दरम्यान, जास्तीत जास्त गरबाप्रेमी आणि स्पर्धकांनी प्रशिक्षण वर्गाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने करण्यात आले आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image