Type Here to Get Search Results !

बनावट विक्रीपत्राचा ‘सातबारा’ कनेक्शन, दोषींना कायमचा घरचा रस्ता दाखवा


 वणी : 

        वडगाव (धं.) येथील बनावट सातबारा, बोगस फेरफार आणि कथित खोट्या कागदपत्रांच्या आधारे करण्यात आलेल्या जमीन व्यवहाराच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील दोषी अधिकारी-कर्मचारी तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी सुरज चाटे यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष तथा आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडे केली आहे.

             बनावट विक्रीपत्राच्या आधारे महसूल अभिलेखात फेरफार करण्यात आल्याचा आरोप असून, त्यानंतर सातबारा उताऱ्यावरही संबंधित नोंदी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून बनावट कागदपत्रे तयार करणारे, त्याचा वापर करणारे तसेच फेरफार प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

             दरम्यान, महाराष्ट्र विधिमंडळाची अंदाज समिती शासनाच्या विविध विभागांच्या कामकाजाचा, खर्चाचा तसेच विकासकामांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणारी महत्त्वाची समिती आहे. ११ सप्टेंबर २०२६ रोजी समितीने वणी तालुक्याचा दौरा करून विविध शासकीय योजना व विकासकामांची पाहणी केली. याच पार्श्वभूमीवर वडगाव (धं.) येथील महसूल अभिलेखातील कथित गैरप्रकाराबाबत समितीच्या अध्यक्षांकडे करण्यात आलेल्या मागणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

                या प्रकरणातील विक्रीपत्राची सत्यता, त्याची कायदेशीर वैधता, फेरफार प्रक्रिया कोणत्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून झाली, सातबारा अभिलेखात करण्यात आलेल्या नोंदींची कायदेशीरता आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची भूमिका यांची स्वतंत्रपणे चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

          केवळ निलंबनाची कारवाई न करता दोषी आढळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी ठाम भूमिका सुरज चाटे यांनी मांडली आहे. महसूल अभिलेखात फेरफार करून नागरिकांच्या जमीन हक्कावर परिणाम करणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर प्रशासकीय तसेच कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

           या तक्रारीची दखल घेऊन प्रशासकीय यंत्रणा आणि विधिमंडळ स्तरावर कोणती कार्यवाही केली जाते, याकडे आता वणी तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad