Type Here to Get Search Results !

वणीच्या विकासप्रश्नांचा अंदाज समितीसमोर पाढा; आमदार संजय देरकर यांचे निवेदन


 वणी : 


      यवतमाळ जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून विधिमंडळ अंदाज समितीचा दौरा सुरू असून, समितीचे सदस्य वणी येथे दाखल झाल्यानंतर आमदार संजय देरकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.


        यावेळी आमदार संजय देरकर व त्यांच्या पत्नी किरणताई देरकर यांनी विधिमंडळ अंदाज समितीच्या सदस्यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. या भेटीदरम्यान वणी विधानसभा क्षेत्रातील विविध प्रलंबित विकासकामे, नागरिकांच्या समस्या तसेच परिसरातील महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


        आमदार संजय देरकर यांनी वणी विधानसभा क्षेत्रातील विविध विकासविषयक प्रश्नांबाबत समितीसमोर निवेदन साद केले. प्रलंबित विकासकामांना गती देण्यासह नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर गांभीर्याने लक्ष देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.


      यावेळी विधिमंडळ अंदाज समितीचे आमदार अर्जुन खोतकर, आमदार दिलीप बोरसे, आमदार काशीराम पावरा आणि आमदार कृष्णा खोपडे यांची उपस्थिती होती. या प्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संघटक गणपत लेडांगे, वणी शहर प्रमुख विनोद ढुमणे, शहर संघटक मनीष बत्रा, नगरसेवक सुधीर थेरे, नगरसेवक अजय ढोबे, नगरसेवक अनिकेत बदखल, नगरसेवक गुलाम रंगरेज, जगणं जुनघरी, अभय मुथा, सुमेर खान, महिला तालुका प्रमुख सुरेखा ढेंगळे आदी उपस्थित होते.


      विधिमंडळ अंदाज समितीच्या या दौऱ्यामुळे वणी विधानसभा क्षेत्रातील विविध विकासविषयक प्रश्न थेट शासनस्तरावर प्रभावीपणे मांडण्याची संधी उपलब्ध झाली असून, प्रलंबित प्रश्नांच्या पाठपुराव्याला यामुळे अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad