Type Here to Get Search Results !

वणी भाजपचा अभिनव उपक्रम, ‘बाप्पा माझा स्पर्धा २०२६’चे आयोजन


 वणी : 

          गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराबाबत जनजागृती व्हावी, तसेच गणेशोत्सव अधिक सुंदर, पर्यावरणपूरक आणि सामाजिक संदेश देणारा व्हावा, या उद्देशाने भारतीय जनता पार्टी, वणी शहर यांच्या वतीने ‘बाप्पा माझा स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.



           या स्पर्धेत ‘अ’ गटात घरगुती गणपती, तर ‘ब’ गटात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येणार आहे. दोन्ही गटांमध्ये स्वदेशी वस्तूंचा वापर किंवा पर्यावरण संवर्धन या दोनपैकी एका विषयावर आकर्षक देखावा सादर करणे आवश्यक आहे. दोन्ही गटांसाठी प्रथम क्रमांकास ₹५,००० व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास ₹३,००० व सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांकास ₹२,००० व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.


        स्पर्धकांनी दि. १६ सप्टेंबर २०२६ पर्यंत आयोजकांनी दिलेल्या क्रमांकावर नोंदणी करून व्हॉट्सॲपद्वारे आपल्या देखाव्याचा फोटो पाठवायचा आहे. त्यानंतर दि. १७ ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजक व परीक्षक प्रत्यक्ष घरी अथवा गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन देखाव्याचे परीक्षण करतील.


         ही स्पर्धा वणी शहर व लगतच्या गावांपुरती मर्यादित राहणार आहे. घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव या दोन्ही गटांमधील निवड झालेल्या प्रत्येकी २० नोंदणींचे परीक्षण करण्यात येणार आहे. नोंदणी करताना घराचा अथवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा संपूर्ण पत्ता तसेच मोबाईल क्रमांक आयोजकांकडे व्हॉट्सॲपद्वारे देणे आवश्यक आहे. इच्छुकांनी शक्यतो सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत व्हॉट्सॲप अथवा फोनद्वारे संपर्क साधावा. स्पर्धेतील परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे.


         या अभिनव उपक्रमात वणी शहरातील नागरिकांनी, गणेशभक्तांनी तसेच गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पर्यावरण संवर्धन आणि स्वदेशीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन माजी आमदार श्री. संजीवरेड्डी बोदकुरवार आणि ॲड. निलेश माया महादेवराव चौधरी, शहर अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी वणी यांनी केले आहे.


          या स्पर्धेचे संयोजक श्री. मनोज सरमुकदम असून सहसंयोजक श्री. गणेश आसूटकर, श्री. बालाजी भेदोडकर, श्री. उमेश गंधारे, डॉ. सौ. नीलिमा दवणे, श्रीमती वैशाली वातिले, सौ. आरती गणेश वांढरे, सौ. संगीता मेश्राम, सौ. प्रिती बिडकर आणि सौ. पूजा रामगिरवार आहेत.


        इच्छुक नागरिकांनी व गणेशोत्सव मंडळांनी पोस्टरवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad