Type Here to Get Search Results !

सगळं प्लॅनिंग परफेक्ट होतं… फक्त पोलिसांच्या एका चालीने गेम बिघडला!


 वणी : 


      महागडा iPhone 16 Pro खरेदी करण्याच्या हट्टापायी विधीसंघर्षग्रस्त बालकाने आजोबांच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार वणीत उघडकीस आला आहे. तब्बल 6 लाख 72 हजार रुपये किमतीच्या 52 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची घरफोडी करणाऱ्या या प्रकरणाचा वणी पोलिसांनी छडा लावला असून, विधीसंघर्षग्रस्त बालकासह एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून चोरीचा संपूर्ण सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


           वणी शहरातील कनकवाडी परिसरातील रहिवासी बंडु विठोबा बोळाले (वय 62 वर्षे) यांनी 1 सप्टेंबर 2026 रोजी वणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्या घरात 20 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2026 दरम्यानच्या रात्री अज्ञात चोरट्याने प्रवेश करून लाकडी कपाटाच्या लॉकरमधून सोन्याचे दागिने चोरून नेले होते. चोरी झालेल्या दागिन्यांची एकूण किंमत 6 लाख 72 हजार रुपये होती.


       या फिर्यादीवरून वणी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 861/2026, कलम 305(अ), 331(4) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.


📌 गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई -


       गुन्ह्याचा समांतर तपास वणी पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाकडून सुरू होता. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे संविधान चौक, वणी येथून एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह गुणवंत उर्फ पोलार्ड पांडुरंग दानव (वय 23 वर्षे, रा. विठ्ठलवाडी, वणी) याला ताब्यात घेण्यात आले. दोघांची अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता या घरफोडीमागील धक्कादायक कारण समोर आले.


📌 आयफोन 16 प्रो घेण्यासाठी चोरी - 


          पोलिसांच्या माहितीनुसार, विधीसंघर्षग्रस्त बालकाला iPhone 16 Pro खरेदी करायचा होता. त्यासाठी पैशांची गरज असल्याने त्याने चोरी करण्याची कल्पना आपल्या सहकाऱ्यांना सांगितली. त्यानंतर आरोपी गुणवंत उर्फ पोलार्ड दानव आणि फरार आरोपी सुरज हुसैन गेडाम (वय 25 वर्षे, रा. दहेगाव, विरस्तुंड, ता. वणी, जि. यवतमाळ) यांनी त्याला प्रोत्साहित केल्याचे तपासात समोर आले आहे.


       त्यानंतर विधीसंघर्षग्रस्त बालकाने 20 ते 21 ऑगस्टच्या रात्री आजोबांच्या घरी जाऊन चावीच्या साहाय्याने लाकडी कपाटाचे लॉकर उघडले आणि त्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याचे पोलिसांनी सांगितले.


📌 चोरलेले सोने विक्रीसाठी नागपूर, चंद्रपूरकडे जाण्याची तयारी - 


          चोरी केलेले सोने विक्री करण्याच्या उद्देशाने विधीसंघर्षग्रस्त बालक आणि आरोपी गुणवंत उर्फ पोलार्ड हे चंद्रपूर किंवा नागपूरकडे जाण्याच्या प्रयत्नात होते. याचदरम्यान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.


📌 त्यांच्याकडून चोरीस गेलेला पुढील सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला —


- सोन्याचा चपलाकंठी हार – 25 ग्रॅम

- मोठा सोन्याचा गोफ – 15 ग्रॅम

- लहान सोन्याचा गोफ – 5 ग्रॅम

- कानातील सोन्याचे टॉप्स – 3 ग्रॅम

- कानातील सोन्याचे टॉप्स – 4 ग्रॅम


        असा एकूण 52 ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल, अंदाजे किंमत 6 लाख 72 हजार रुपये, पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणातील फरार आरोपी सुरज हुसैन गेडाम याचा वणी पोलिसांकडून शोध सुरू आहे.


📌 डी.बी. पथकाची उल्लेखनीय कामगिरी -  


       ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी वणी सुरेश दळवे आणि पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


      डी.बी. पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सैय्यद साजीद, पोलीस हवालदार गजानन सावसाकडे, पोलीस अंमलदार गणेश मेश्राम, नंदकुमार पुप्पलवार, मोनेश्वर खंडरे आणि रितेश भोयर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.


        वणी पोलिसांच्या तत्पर तपासामुळे 6.72 लाख रुपयांच्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून, चोरी गेलेला संपूर्ण सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad