वणी :
केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात तसेच महागाई, बेरोजगारी, शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI) वतीने १ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘बदलाव जरूरी है’ महारॅली आयोजित करण्यात आली आहे.
या महारॅलीत सहभागी होण्यासाठी वणीसह यवतमाळ जिल्ह्यातील CPI कार्यकर्ते व समर्थकांचा दुसरा जथ्था विविध वाहनांनी दिल्लीकडे रवाना झाला. जिल्हासचिव कॉ. अनिल घाटे, वणी तालुका सचिव कॉ. मोरेश्वर कुंटलवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते या जथ्थ्यात सहभागी झाले.
महागाईला आळा घालणे, तरुणांना रोजगार देणे, कामगारांचे हक्क सुरक्षित करणे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणे तसेच अंगणवाडी, आशा व शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्याच्या मागण्या या महारॅलीत मांडल्या जाणार आहेत.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या