Type Here to Get Search Results !

रस्ते, आरोग्य, जलसंधारणासाठी संजय देरकर यांचा शासनाकडे निधीचा आग्रह


 वणी : 


        जिल्हा वार्षिक योजना बैठकीत आमदार संजय देरकर यांनी वणी विधानसभा क्षेत्रातील रस्ते, आरोग्य, जलसंधारण, वनविकास, वीजपुरवठा व नगरविकासाशी संबंधित विविध प्रश्न शासनासमोर मांडले.



       मुख्यमंत्री ग्रामसडक व बळीराजा शेत/पाणंद रस्ता योजनेत वणी क्षेत्राला आवश्यक निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. वणी ग्रामीण रुग्णालयातील मनुष्यबळ व औषधांचा तुटवडा दूर करून कायर येथील रिक्त पदे भरण्याची, तसेच शिंदोला प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली.


             मारेगाव नगरपंचायत व वणी नगरपरिषदेच्या विकासकामांसाठी नगरोत्थान योजनेतून निधी, तसेच भूजल पातळी वाढविण्यासाठी तलाव व जलसाठे निर्माण करण्याची मागणी त्यांनी केली. वनविकासासोबतच अडकोली-पवनार वन्यजीव सफारी व कवडशी इको-टुरिझम प्रकल्पाला चालना देण्याची मागणीही करण्यात आली.


         कृषी पंपांचे नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, मारेगाव तालुक्यात आवश्यक ठिकाणी स्मशानभूमी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच मूर्ती-बोरी पुलासाठी तातडीने निधी मंजूर करावा, अशी मागणी आमदार देरकर यांनी केली.


        वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, ग्रामीण नागरिक, कामगार, आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देऊन संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image