Type Here to Get Search Results !

Students Matter! वणीत घुमला निषेध


 वणी : 

      दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट (NEET-UG) परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ गुरुवारी वणी शहर व तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.


      मोर्चानंतर राष्ट्रपतींच्या नावे तहसील प्रशासनाला निवेदन देत, नीट प्रकरणाची निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई तसेच विद्यार्थी आंदोलनावरील पोलिसी कारवाईची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.


     यावेळी पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा युवकांमधील असंतोष वाढू शकतो, असा इशारा दिला. मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समविचारी संघटनांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad