Type Here to Get Search Results !

पावसातही BJP चा सेवा उपक्रम हिट, वणीत २७२ जणांचे रक्तदान

वणी : 

            महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यभर राबविण्यात आलेल्या रक्तदान महायज्ञाला वणी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वाखाली बाजोरिया हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात ४१२ जणांनी नोंदणी केली असून त्यापैकी २७२ रक्तदात्यांचे रक्तसंकलन करण्यात आले.


         प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष अॅड. प्रफुल चव्हाण यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी वणी शहर, वणी ग्रामीण पूर्व आणि वणी ग्रामीण पश्चिम यांच्या संयुक्त विद्यमाने हेडगेवार रक्तकेंद्र, नागपूर यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.


        शिबिरात वणी शहरातून २०५ जणांनी नोंदणी केली असून त्यापैकी १५२ जणांनी रक्तदान केले. वणी ग्रामीण पूर्वमधून १३२ नोंदणींपैकी ७० जणांचे रक्तसंकलन करण्यात आले, तर वणी ग्रामीण पश्चिममधून ७५ नोंदणींपैकी ५० जणांनी रक्तदान केले.


        या शिबिराला माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, ज्येष्ठ किसान नेते दिनकर पावडे, ज्येष्ठ कामगार नेते विजय पिदुरकर, माजी जिल्हाध्यक्ष राजू डांगे, तारेंद्र बोर्ड, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवन एकरे तसेच मंगला पावडे आदी मान्यवरांनी भेट देऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविले.


      शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी नगराध्यक्ष विद्याताई आत्राम, उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार, विधानसभा प्रमुख संजय पिंपळशेंडे, जिल्हा उपाध्यक्ष रवी बेलुरकर, रक्तदान अभियानाचे विधानसभा संयोजक अंकुश बोडे, संतोष डंभारे, नितीन वासेकर, गजानन विधाते, लिशाताई विधाते, जयमालाताई दरवे, संध्याताई लोडे तसेच विविध आघाड्यांचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.


        दिवसभर मुसळधार पाऊस सुरू असतानाही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केल्याबद्दल आयोजकांनी सर्व रक्तदाते व नागरिकांचे आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन भारती बदखल यांनी केले तर आभार प्रदर्शन वैशाली वातिले यांनी केले. शिबिरासाठी बाजोरिया हॉलचे संचालक विनोद बाजोरिया यांचे विशेष सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad