Type Here to Get Search Results !

‎Reason Unknown, वागदरा येथे विवाहित महिलेची आत्महत्या!


 

वणी :

‎.       शहरालगत असलेल्या वागदरा (नवीन) येथे एका ४२ वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार, ८ जुलै रोजी पहाटे उघडकीस आली. मनिषा रवि बोथले (वय ४२) असे मृत महिलेचे नाव आहे.


‎           सर्व काही सुरळीत सुरू असताना मनिषा यांनी अचानक हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

‎.  

पहाटे ही घटना उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या आत्महत्येमागील नेमक्या कारणाचा शोध पोलीस घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad