Type Here to Get Search Results !

चोरट्यांचा Confidence झाला Over, वणी पोलिसांनी केला Takeover


वणी :

             पोलीस स्टेशन वणी हद्दीतील घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत वणी पोलिसांनी तीन गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळविले आहे. या कारवाईत चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून नगदी रक्कम व चोरीचा मुद्देमाल असा एकूण 20 हजार 900 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.  


      मा. पोलीस निरीक्षक तथा ठाणेदार श्री. भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शोध पथकाने गोपनीय यंत्रणा सक्रिय करून तसेच शहरात सतत गस्त घालत तपास सुरू ठेवला होता. प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अभिलेखावरील गुन्हेगार सुमित राजू मानकर (वय 22, रा. रंगनाथनगर, वणी) व राहुल उर्फ टिकल्या निलकंठ ठेंगणे (वय 32, रा. रंगनाथनगर, वणी) यांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्यांनी दिलेल्या कबुलीजबाबावरून घरफोडीचा गुन्हा (अपराध क्र. 559/2026) तसेच घरफोडीच्या प्रयत्नाचा गुन्हा (अपराध क्र. 570/2026) उघडकीस आला.  


     याशिवाय दुसऱ्या एका प्रकरणात दोन महिला आरोपी व विजय देवानंद मेश्राम (वय 32, रा. नवीन लालगुडा, वणी) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत बॅटरी चोरीचा गुन्हा (अपराध क्र. /2026, कलम 303(2) बीएनएस) उघडकीस आला. या कारवाईदरम्यान आरोपींकडून नगदी रक्कम तसेच दोन मोठ्या बॅटऱ्या असा एकूण 20 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  


     सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी (पांढरकवडा प्रभार वणी) श्री. रॉबीन बन्सल व ठाणेदार श्री. भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत डीबी पथक प्रमुख पोउपनि सैय्यद साजीद, पोलीस हवालदार गजानन सावसाकडे, मारोती पाटील, निलकमल भोसले, पोलीस अंमलदार गणेश मेश्राम, नंदकुमार पुप्पलवार, मोनेश्वर खंडारे, चालक शुभम किन्नाके, पोलीस महिला अंमलदार चैताली चेन्डे आदींनी सहभाग घेतला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

file-00000000607071fa94a1583f7cbced57