Type Here to Get Search Results !

‎विजय चोरडिया इन ॲक्शन! अवजड वाहतुकीविरोधात नांदेपेरा रस्त्यावर ‎

वणी :
‎.             नांदेपेरा गावातून सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे नागरिक, विद्यार्थी व शिक्षकांना होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ शिवसेना जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. २१ जुलै) ग्रामस्थांनी शांततापूर्ण चक्काजाम आंदोलन केले. वाढत्या अपघातांचा धोका, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि वाहतुकीच्या कोंडीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
‎          आंदोलनादरम्यान विजय चोरडिया यांनी ग्रामस्थांच्या मागण्या ठामपणे प्रशासनासमोर मांडत अवजड वाहतुकीवर तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी केली. आंदोलनाची माहिती मिळताच वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार भानुदास पिदूरकर तसेच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली.
‎         ग्रामस्थांच्या मागण्या गांभीर्याने घेऊन संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन पोलिस प्रशासनाने दिले. विजय चोरडिया यांच्या पुढाकाराने प्रशासनाशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आणि आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
‎         या आंदोलनात राहुल मुंजेकर, शुभम गोरे (युवासेना लोकसभा समन्वयक), राहुल पारखी, रोहन पारखी, कपिल कुंटलवार, अमृत पुरी, राजू खामणकर, गणेश लांडगे, प्रज्योत ठावरी, निलेश हेपट यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची तातडीने अंमलबजावणी करून नांदेपेरा गावातील अवजड वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण आणावे, अशी मागणी विजय चोरडिया यांनी यावेळी केली.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad