Type Here to Get Search Results !

वणीत रंगला विठुरायाचा सोहळा, शतकांपूर्वीच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी

वणी : 

       स्थानिक आंबेडकर चौकातील नवदुर्गा मंदिराशेजारील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जगन्नाथ मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष संजय खाडे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पूजन करण्यात आले.


       कार्यक्रमाच्या प्रारंभी नवदुर्गा मंदिराचे अध्यक्ष रवी बेलूरकर, दौलत वाघमारे, प्रमोद लोणारे व चंदन मोहुरले यांनी संजय खाडे यांचे स्वागत केले. महाआरतीनंतर उपस्थित भाविकांना फराळाचे वितरण करण्यात आले.


      शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेल्या या विठ्ठल मंदिराची उभारणी हेमाडपंती स्थापत्यशैलीत करण्यात आली असून, मंदिराचा सभामंडप सन १९२१ मध्ये बांधण्यात आला आहे. या ऐतिहासिक मंदिरात आषाढी एकादशी निमित्त दिवसभर भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली.


         यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे, उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के, अनिल अक्केवार, लक्ष्मण उरकुडे, अर्जुन उरकुडे, दीपक दिकुंडवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले.


        उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अविनाश कामटकर, राजकुमार अमरवाणी, मारुती गोखरे, नितीन बिहारी, स्वप्निल बिहारी, नितीन मसेवार, पुरुषोत्तम मांदाडे, नीरज लोणारे, संजय लोणारे, दीपक हांडे, रितेश सानेकर, धम्मा मनवर, राजू जयस्वाल व अमोल बदखल यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन सुनील इंदुवामन ठाकरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिवा आसुटकर यांनी केले.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad