रासा :
जिजाऊ इंग्लिश मीडियम स्कूल, रासा येथे नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे फुलांचा वर्षाव, टाळ्यांचा गजर आणि आनंददायी वातावरणात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुलजी देरकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उरकुडे सर, गणेशजी वासेकर, मीराताई पोतराजे, आरोग्य सेविका मानकर मॅडम, आरोग्य सेवक हाके साहेब, निंदेकर ताई तसेच प्रगती ताई गंधेवार उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत नियमित शिक्षण, शिस्त, स्वच्छता आणि सर्वांगीण विकासाचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे प्रभावी संचालन वरारकर मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मून मॅडम, कोटरंगे मॅडम, पोटे मॅडम, जवादे मॅडम, पायघन मॅडम, समीक्षा मॅडम आणि पिदूरकर मॅडम यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या शेवटी गाऊत्रे सर यांनी उपस्थित मान्यवर, पालक आणि सर्वांचे आभार मानले. या प्रवेशोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पालकांनीही शाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या