Type Here to Get Search Results !

वणी लायन्स इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यी प्रवेशोत्सव उत्साहात साजरा


वणी : 

         वणी लायन्स इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,(नांदेपेरा मार्ग), रवीनगर व देशमुखवाडी वणी येथे ३० जून २०२६ रोजी नवीन शैक्षणिक सत्राच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व चाॅकलेट देऊन उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.


             यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार मा. संजीवरेड्डी बोदकुरवार, लायन्स क्लबचे अध्यक्ष तुषार नगरवाला, लायन्स स्कूलचे उपाध्यक्ष मा. लायन बलदेवजी खुंगर व विश्वस्त मा. लायन महेंद्रजी श्रीवास्तव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच शाळेचे अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे , प्राचार्या चित्रा देशपांडे व पर्यवेक्षिका सुनीता खुसपुरे उपस्थित होत्या.


        सुरुवातीला विद्येची देवता मां शारदा व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रवेशोत्सवाला सुरूवात झाली.


       अध्यक्ष संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना, नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत, शिक्षणाबरोबरच शिस्त, संस्कार आणि सर्वांगीण विकासाचे महत्त्व पटवून दिले. महेंद्रजी श्रीवास्तव यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील प्रत्येक संधीचा सकारात्मक उपयोग करून यश संपादन करण्याचा संदेश दिला.


         शाळा प्रवेश उत्सव कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात पार पडला.यावेळी पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.   

✔ Official SK News Community

🟢 Join SK News WhatsApp Group

ब्रेकिंग न्यूज, सरकारी योजना, भरती अपडेट्स, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या सूचना सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत WhatsApp Group मध्ये सहभागी व्हा.

📲 Join Now
          अशाच ताज्या आणि विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी SK News ला नियमित भेट द्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

file-00000000607071fa94a1583f7cbced57