Type Here to Get Search Results !

‎Small Town, Big Dream! वरोऱ्याची ईश्वरी राऊत Team India मध्ये

‎वरोरा :
‎       येथील लोकमान्य टिळक हायस्कूलची विद्यार्थिनी कु. ईश्वरी विलास राऊत हिने आपल्या अथक मेहनती, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर भारतीय हॉलीबॉल संघात स्थान मिळवून वरोरा, चंद्रपूर जिल्हा आणि संपूर्ण विदर्भाचे नाव उज्ज्वल केले आहे. दि. 28 जून 2026 रोजी भारतीय हॉलीबॉल संघासाठी तिची निवड झाल्याने सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
✔ Official SK News Community

🟢 Join SK News WhatsApp Group

ब्रेकिंग न्यूज, सरकारी योजना, भरती अपडेट्स, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या सूचना सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत WhatsApp Group मध्ये सहभागी व्हा.

📲 Join Now

100% मोफत • कोणतेही शुल्क नाही

‎    लहानपणापासूनच हॉलीबॉल खेळाची आवड असलेल्या ईश्वरीने विविध जिल्हास्तरीय, विभागीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली. तिच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे आणि क्रीडाप्रेमाचे फळ म्हणून तिला आता भारताचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. देशासाठी खेळण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते आणि ईश्वरीने हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवून अनेक तरुण खेळाडूंसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
‎       ईश्वरीच्या या यशामुळे तिचे आई-वडील, कुटुंबीय, शिक्षक, प्रशिक्षक, मित्र-मैत्रिणी तसेच वरोरा शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तिच्या निवडीमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भासाठी हा अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण मानला जात आहे.
‎    विशेष म्हणजे, ईश्वरी राऊत ही वणी शहरातील ओम नगर येथे वास्तव्यास असलेल्या WCL चे सेवानिवृत्त वरिष्ठ सुरक्षा निरीक्षक स्व. नारायणराव गणुजी गावंडे यांची नात असल्याने वणी शहरातही तिच्या यशाचा मोठा आनंद व्यक्त केला जात आहे. नातेवाईक, मित्रपरिवार आणि विविध सामाजिक संघटनांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, तिच्या या यशामुळे वणी शहराच्याही शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
‎       तसेच, तिरळे कुणबी समाजासाठीही ईश्वरीचे हे यश प्रेरणादायी ठरले असून, समाजातील अनेकांनी तिचे कौतुक करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडूनही तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
‎    भारतीय संघाच्या जर्सीतून ईश्वरी राऊत हिने उत्कृष्ट कामगिरी करत देशाला यश मिळवून द्यावे, अशी अपेक्षा सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे. तिच्या या ऐतिहासिक निवडीमुळे वरोरा, वणी, चंद्रपूर जिल्हा आणि संपूर्ण विदर्भाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, या गुणी कन्येचे सर्वत्र मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. तिच्या पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी सर्व स्तरातून हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

file-00000000607071fa94a1583f7cbced57