Type Here to Get Search Results !

No More Paper Leaks! वणीत Youth Power रस्त्यावर

वणी :

‎           दिल्लीतील जंतरमंतर येथे अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ वणी येथे युवक व विद्यार्थ्यांनी शांतीपूर्ण आंदोलन करत एकजूट दर्शविली. टिळक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ झालेल्या या आंदोलनाला युवाशक्ती क्रांतिकारी संघटनेने सक्रिय पाठिंबा दिला.


‎             पेपरफुटीच्या घटना, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, वाढती बेरोजगारी आणि शिक्षणाचे खाजगीकरण या मुद्द्यांवर आंदोलन केंद्रित होते. यावेळी संभाजी ब्रिगेड, AISF, विविध स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, वणी वकील संघ तसेच विदर्भ राज्य आंदोलन समितीनेही पाठिंबा दर्शविला.


‎          युवकांच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवाशक्ती क्रांतिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad