झरी :
तालुक्यातील माथार्जून येथे भारतीय जनता पक्षाचा पक्षप्रवेश सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विविध पक्ष व संघटनांतील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून विकासाभिमुख राजकारणाला पाठिंबा दर्शविला.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व अध्यक्ष म्हणून माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार उपस्थित होते. त्यांच्या प्रभावी नेतृत्वशैली, विकासकामांप्रती असलेली बांधिलकी आणि जनसामान्यांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क यामुळे प्रेरित होऊन अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. बोदकुरवार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनतेशी नाळ जोडून ठेवण्याचे आवाहन केले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अंकुश बोढे, सुरेश बोलेरवाल, तालुका अध्यक्ष नागेश घुगुल, तालुका महामंत्री विनोद निखाडे, जितेंद्र डुकरे, सतीश नाखले, दिनेश जयस्वाल, रवि काईतवार, योगेश भाऊ, मुन्ना भाऊ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. विकासाचा मार्ग, जनतेचा विश्वास आणि मजबूत संघटनशक्ती यांच्या बळावर आगामी काळात भाजपची ताकद अधिक वाढविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
माथार्जून परिसरातील वाढता जनाधार आणि माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यावरील विश्वास यामुळे हा पक्षप्रवेश सोहळा राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या