Type Here to Get Search Results !

‎चारगाव चौकीजवळ एसटीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार ठार ‎


 ‎वणी : 

‎           वणी-घुग्गुस मार्गावरील चारगाव चौकी येथील पेट्रोलपंपाजवळ गुरुवारी (११ जून) सकाळी साडेनऊच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार रवींद्र बाळकृष्ण मालेकर (वय ४५, रा. शेलू) यांचा जागीच मृत्यू झाला. पेट्रोलपंपाजवळ उभ्या असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करताना मागून भर धाव येणाऱ्या एसटी बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात मालेकर बसच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

‎              अपघातावेळी त्यांच्या सोबत असलेली १८ वर्षीय मुलगी किरकोळ जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, रस्त्यावर बेजबाबदारपणे उभे केले जाणारे ट्रक अपघातांना कारणीभूत ठरत असल्याने संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

file-00000000607071fa94a1583f7cbced57