Type Here to Get Search Results !

चिखलगावमध्ये छापा! “सिक्रेट स्टॉक” झाला जप्त


 ‎वणी :

‎          वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लालपुलीया, चिखलगाव परिसरात देशी दारूची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई दिनांक 09 जून 2026 रोजी सकाळी करण्यात आली.

‎        मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पो. कॉ. प्रविण जाधव (बॅ. नं. 2466), पोलीस स्टेशन वणी यांच्या तक्रारीवरून आरोपी अभिनय सुनिल गोलाइत (वय 25 वर्ष, रा. माळीपुरा, वणी) याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

‎          घटनास्थळी पोलिसांनी केलेल्या तपासणीत आरोपीच्या ताब्यातील काळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत देशी दारूचे 90 मि.ली क्षमतेचे 20 पव्वे आढळून आले. प्रत्येकी 40 रुपये किंमत असलेल्या या मुद्देमालाची एकूण किंमत 800 रुपये इतकी आहे. सदर दारू अवैधरीत्या विक्रीसाठी बाळगल्याचे निष्पन्न झाले.

‎     ही कारवाई पोलीस हवालदार निलकमल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad