Type Here to Get Search Results !

‎जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चौहान यांच्या हस्ते वणी भाजपा कार्यालयाचे उद्घाटन ‎


 वणी : 

‎       माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते संजीवरेड्डीजी बोदकुरवार यांच्या नेतृत्वाखाली वणी विधानसभा क्षेत्रात पक्षसंघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या भाजपा जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. भाजपा यवतमाळ जिल्हाध्यक्ष मा. अँड. प्रफुल्लजी चौहान यांच्या हस्ते पक्षध्वज उभारणी व जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

‎      यावेळी भाजपा महिला मोर्चा आघाडीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तसेच अनेक महिलांनी माजी आमदार संजीवरेड्डीजी बोदकुरवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा आणि संघटन अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

‎     या कार्यक्रमाला मा. विद्याताई आत्राम, दिनकर पावडे, विजय पिदुरकर, संजय पिंपळशेंडे, रवीजी बेलुरकर, अंकुश बोढे, प्रदीप जेऊरकर, मीराताई पोतराजे, अँड. निलेश चौधरी, संतोष डंभारे, नितीन वासेकर, महादेवराव खाडे सर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‎       यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार संजीवरेड्डीजी बोदकुरवार म्हणाले की, "वणी विधानसभा क्षेत्रातील जनतेशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या त्वरित जाणून घेऊन त्यावर पाठपुरावा करण्यासाठी हे जनसंपर्क कार्यालय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पक्षसंघटन अधिक मजबूत करत विकासाभिमुख राजकारणाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे."

‎      कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून, माजी आमदार संजीवरेड्डीजी बोदकुरवार यांच्या नेतृत्वाखाली वणी विधानसभा क्षेत्रात भाजपाची संघटनात्मक ताकद आणखी वाढणार असल्याचा विश्वास उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

file-00000000607071fa94a1583f7cbced57