Type Here to Get Search Results !

सुपर स्प्लेंडरवर ‘संत्रा’चा स्टॉक, वणी पोलिसांनी केला गेम ओव्हर!


 वणी :

‎           वणी पोलीस स्टेशनच्या पथकाने शाम टाकीज बिट परिसरातील वरोरा नाक्याजवळ अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध कारवाई करून १ लाख ३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
‎            पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीनिवास चंदय्या कंकडवार (वय 50), रा. वार्ड क्र. 2, मांजरी, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर यास दिनांक 17 जून 2026 रोजी सायंकाळी 6.40 ते 7.10 वाजताच्या दरम्यान शाम टाकीज बिट परिसरातील वरोरा नाक्याजवळ ताब्यात घेण्यात आले.
‎          यावेळी आरोपीच्या ताब्यातील हिरो होंडा सुपर स्प्लेंडर दुचाकीच्या डिक्कीवर ठेवलेल्या बॅगमध्ये रॉकेट देशी दारू (संत्रा कंपनी) 90 एम.एल. क्षमतेच्या एकूण 95 शिश्या आढळून आल्या. प्रत्येकी 40 रुपये किंमतीनुसार या दारूची एकूण किंमत 3 हजार 600 रुपये असून, दुचाकीसह एकूण 1 लाख 3 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
‎          या प्रकरणी आरोपीविरुद्ध कलम 65 (अ) (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये वणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नापोका  विशाल मोहन राठोड करीत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका अविनाश चिक्राम व नापोका विशाल राठोड यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

file-00000000607071fa94a1583f7cbced57