वणी :
वणी परिसरात कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीने वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
तक्रारदाराचा त्याच्या पत्नीबरोबर काही दिवसांपासून वाद सुरू होता. दि. 3 जून 2026 रोजी दुपारी सुमारे 4 वाजता घरी असताना वाद मिटवण्यासाठी काही नातेवाईक घरी आले होते.
या वेळी उपस्थित असलेल्या नातेवाईकांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन वाद वाढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर झालेल्या झटापटीत तक्रारदाराचा हात मुरगळण्यात आला तसेच उजव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाल्याचे सांगण्यात आले आहे.
वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलमांनुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या