Type Here to Get Search Results !

‎4 वेळा उपोषण, आदेशही झाले... तरी शिवरस्ता 'Blocked', 'जगायचं की मरायचं?' शेतकऱ्यांचा सरकारला सवाल! ‎


 मारेगाव  : 

‎         खडकी–करणवाडी ते घोडदरा व नरसाळा गावांना जोडणारा शिवधुरा (पांदण) रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याचे महसूल प्रशासनाचे आदेश असूनही प्रत्यक्ष कारवाई न झाल्याने शेतकरी व ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

‎           वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राजू निमसटकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला शेतकरी सहभागी झाल्या आहेत. आंदोलक संदीप उमरे यांनी यापूर्वी चार वेळा आमरण उपोषण करूनही प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्याचा आरोप केला.

‎         महसूल विभाग कारवाई टाळत असल्याचा आरोप करत प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, "शेतात जाण्याचा रस्ता नाही, मग आम्ही जगायचं की मरायचं?" असा संतप्त सवाल महिला शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

‎     प्रश्न निकाली न लागल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

‎◆ ठळक मुद्दे :

‎शिवरस्ता अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश असूनही कारवाई नाही.

‎चार वेळा उपोषणानंतरही प्रश्न प्रलंबित.

‎राजू निमसटकर यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत अन्नत्याग आंदोलन.

‎महिला शेतकऱ्यांचा प्रशासनाला संतप्त सवाल.

‎उच्चस्तरीय चौकशी व तातडीने कारवाईची मागणी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

file-00000000607071fa94a1583f7cbced57