ज्ञानदा बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था, मुकूटबन द्वारा संचालित आर्या इंटरनॅशनल स्कूल, मुकूटबन ने यंदाही दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
शुक्रवार, ८ मे २०२६ रोजी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात शाळेने तालुक्यात सलग पाचव्यांदा प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. विशेष म्हणजे, शाळेच्या विद्यार्थ्यांनी तालुक्यात प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवत संस्थेच्या नावलौकिकात भर घातली.
तालुक्यात प्रथम क्रमांक झोयापरवीन तन्वीर अहमद हिने ९५.८० टक्के गुणांसह मिळविला, तर युग प्रवीण बघेले याने ९४.०० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक पटकावला.
तसेच, प्रतीक संदीप कांदसवार, गौरव प्रकाश कापनवार आणि आलेमीनजिया मुजीब शेख या तिन्ही विद्यार्थ्यांनी ९०.२० टक्के गुण प्राप्त केले. यापैकी प्रतीक कांदसवार याने गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून विशेष यश संपादन केले.
याशिवाय पुढील विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश मिळविले :
गायत्री खुशाल उरकुडे – ८७.६०%
नावेद फहिम सैय्यद – ८७.४०%
आदित्य चंद्रकांत घुगुल – ८६.४०%
आकांक्षा परेंद्र उपरे – ८५.८०%
खामोशी किशोर पानघाटे – ८५.४०%
लीना संतोष आसुटकर – ८५.४०%
अक्षरा अनिल चव्हाण – ८४.८०%
सैय्यद दिलशाद सैय्यद इब्राहिम – ८३.८०%
तुषार रवींद्र पिंगे – ८०.६०%
श्रुती गणेश मासाटवार – ८०.६०%
आर्या इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही यशाची परंपरा कायम राखत तालुक्यात आपला दबदबा सिद्ध केला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक, सर्व मार्गदर्शक शिक्षक तसेच पालकांना दिले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या