Type Here to Get Search Results !

‎संजय खाडे यांच्या नेतृत्वाखाली उकणी लढा; खा. धानोरकरांचा ठाम पाठिंबा

वरोरा :

‎              उकणी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या 3 मे पासूनच्या चक्काजाम आंदोलनाला खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी ठाम पाठिंबा दिला. काँग्रेस नेते संजय खाडे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन निवेदन सादर केले.
‎         उकणी येथील सुशिक्षित, कुशल-अकुशल बेरोजगार युवक-युवती व हेव्ही वाहन चालकांना स्थानिक स्तरावर रोजगार द्यावा, तसेच सुमारे 200 कामगारांना एम/एस नारायणी अँड सन्स कंपनीत प्राधान्याने सामावून घ्यावे, अशी मुख्य मागणी आहे. मात्र कंपनीकडून निर्णय न झाल्याने नाराजी वाढली आहे.
‎         संजय खाडे यांनी या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करत आंदोलनाची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून, त्यांच्या नेतृत्वामुळेच प्रश्नाला राजकीय व सामाजिक बळ मिळाल्याचे मानले जात आहे.
‎        खा. धानोरकर यांनी निवेदन स्वीकारत सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले व आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.
‎        यावेळी अध्यक्ष स्वप्नील गोवारदीपे, उपाध्यक्ष अजय खाडे, सचिव विजय कार्लेकर, कार्याध्यक्ष विनायक येसेकर, सहसचिव प्रभाकर खोब्रागडे, कोषाध्यक्ष मनोज खाडे तसेच सदस्य कान्हू लोनगाडगे, विशाल गजानन चिंचोलकर, नरेंद्र खाडे, प्रथम अंड्रस्कर, रोशन गोबाडे, शुभम चिंचोलकर, सुमेध अंड्रस्कर, अमित पारशिवे, विजय येमूर्ले, सूरज पारशिवे, अरुण डाहुले, किसन पारशिवे, यश शिवरकर, सचिन येमूर्ले, साहिल जोगी, रविंद्र जुनगरी, विशाल निब्रड, साईनाथ ठमके, संतोष दुधूलकर, रामकिसन पारशिवे, सुभाष ढवळे, प्रशांत पाटील, अक्षय ढपकस, सूरज काकडे, संतोष धोंडे, रंजित पारशिवे, मयूर सातपुते आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad