Type Here to Get Search Results !

वणीमध्ये भरउन्हात शेतकऱ्यांचा प्रचंड मोर्चा, कराराविरोधात आवाज ‎


 वणी : 

‎              येथे महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने भारत-अमेरिका प्रस्तावित व्यापार कराराविरोधात भरउन्हात मोठा मोर्चा काढण्यात आला. राज्यव्यापी आंदोलनाच्या हाकेला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मोर्चानंतर तहसीलदारांना राष्ट्रपतींच्या नावे निवेदन देण्यात आले.

‎          निवेदनात या करारामुळे शेती, सहकार क्षेत्र आणि राज्यांच्या अधिकारांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. MSP व FRP यंत्रणा कमकुवत होऊ शकते, तसेच कर्जमाफी, शेती अनुदान आणि ग्रामीण रोजगारावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे नमूद करण्यात आले. लघु व सीमांत शेतकरी अधिक अडचणीत येण्याचीही भीती व्यक्त करण्यात आली.

‎             या पार्श्वभूमीवर करार तात्काळ रद्द करावा, तसेच त्याच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी संसदीय समिती स्थापन करावी, अशी मागणी करण्यात आली. मोर्चाचे नेतृत्व किसान सभेचे राज्य कौंसिलर कॉ. अनिल घाटे, कॉ. अनिल हेपट, भाकपचे तालुका सचिव कॉ. मोरेश्वर कुंटलवार, तसेच कॉ. भास्कर बल्की, कॉ. अथर्व निवडींग व कॉ. पांडुरंग ठावरी यांनी केले. मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad