Type Here to Get Search Results !

काही सेकंदांचा निष्काळजीपणा; एका कुटुंबाचा आधार हिरावला

वणी : 

‎        तालुक्यातील वणी-वरोरा मार्गावर आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

‎         मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील बाबाराव कुत्तरमारे (वय 45, रा. मानकी ता. वणी, जि. यवतमाळ) यांचा भाऊ व त्याचा मित्र हे दोघेही दुचाकी (क्रमांक MH29BQ9635) ने वणीहून वरोराकडे जात होते. दरम्यान, झोला फाटा जवळ वणी-वरोरा रोडवर दुपारी सुमारे 12.30 वाजताच्या सुमारास मागून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारने (क्रमांक MH14GD6835) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

‎           सदर कारचा चालक अमोल मलकापुरे (रा. मारेगाव) याने वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप आहे. या अपघातात फिर्यादीच्या भावाचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

‎         घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी फिर्यादीच्या जबानीवरून वणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 281, 125 (A), 125 (B), 106 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

‎               दरम्यान, या अपघातामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, भरधाव व निष्काळजी वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. वाहतूक नियमांचे पालन न केल्यास अशा दुर्घटना घडत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad