Type Here to Get Search Results !

‎एक फोन, एक बातमी… आणि घरात उडाली धावपळ! मुलगी बेपत्ता

‎वणी :

‎           शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, वणीतील एका कुटुंबातील मुलगी दि. 3 मार्च रोजी दुपारी संतोषी माता मंदिर परिसरातून रहस्यमयरीत्या गायब झाली.


‎         कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मुलगी दुपारी मंदिरात दिसली होती आणि त्यानंतर घरी परत येण्यासाठी निघाली, मात्र ती घरी पोहोचलीच नाही. नातेवाईक व मित्रपरिवाराने शहरात सर्वत्र शोध घेतला, तरीही तिचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. विशेष म्हणजे, तिच्या मोबाईलवर कॉल केल्यास रिंग जाते, पण प्रतिसाद मिळत नसल्याने संशय अधिकच गडद झाला आहे.


‎       या प्रकरणात अज्ञात इसमाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, वणी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 137(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad