Type Here to Get Search Results !

साधं दिसणारं दुकान… पण आत सुरू होतं काहीतरी वेगळंच!

वणी :

‎            शहरात अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत प्रतिबंधित पानमसाला व खर्र्याचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.


‎          मिळालेल्या माहितीनुसार, दि. 17 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास “मामा पान सेंटर”, मेन पोस्ट ऑफिससमोर, वणी येथे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या कारवाईत आरोपी सय्यद नवाज अली सय्यद बशीर अली (वय 32) यांच्या दुकानातून तब्बल 1.47 किलो वजनाचा व सुमारे 3240 रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला.


‎           जप्त केलेल्या मालामध्ये विविध ब्रँडचे पानमसाला (सिनेचर, विमल, पानपराग) तसेच मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू व सुपारी मिश्रित खर्रा आढळून आला. हे पदार्थ राज्यात विक्रीस बंदी असतानाही उघडपणे विक्रीस ठेवले होते, ही गंभीर बाब समोर आली आहे.


‎          या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 व संबंधित नियम 2011 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


‎       अशा प्रकारे प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, या कारवाईमुळे वणी शहरातील पानठेले व विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनीही अशा बेकायदेशीर धंद्यांवर अंकुश ठेवण्याची मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image