Type Here to Get Search Results !

मनसेच्या आंदोलनाला यश; रासा–साखरा रस्त्याच्या दुरुस्तीबाबत प्रशासनाची लेखी ग्वाही


वणी : 

‎             रासा ते साखरा मार्गावरील अत्यंत खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने छेडलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. या आंदोलनानंतर प्रशासनाने संबंधित रस्त्याबाबत लेखी आश्वासन दिले आहे.

‎            सन्माननीय राजूभाऊ उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, फाल्गुन गोहोकार यांच्या पुढाकाराने व विभाग प्रमुख लक्ष्मण उपरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले होते. रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने मनसेने आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले होते.

‎             आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला झुकावे लागले असून, संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची ग्वाही दिली आहे. सध्या रस्त्यावरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात डांबरी बुजवून दुरुस्ती (डागडुजी) करण्यात येणार आहे. तसेच मार्च महिन्यानंतर संपूर्ण रस्त्याच्या नूतनीकरणासाठी पुढील कार्यवाही करून पाठपुरावा करण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले आहे.

‎           मनसेच्या या आंदोलनामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून, रस्त्याच्या प्रश्नाकडे प्रशासनाने अखेर लक्ष दिल्याची भावना व्यक्त होत आहे. या आंदोलनात मनसैनिकांसह मोठ्या संख्येने गावकरी सहभागी झाले होते. यामध्ये भोला चिकनकर, प्रतीक पानगटे, नंदलाल अहिरकर, संकेत मोहिते, सुरेश दुधकोहळ, उमेश झाडे, निखिल आस्वले, रोशन थाटे आदी कार्यकर्त्यांचा सहभाग होता. मनसेच्या या लढ्यामुळे रस्ता प्रश्न लवकरच मार्गी लागेल, अशी आशा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad