Type Here to Get Search Results !

जागतिक महिला दिनानिमित्त नगराळे हॉस्पिटल येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर


 वणी : 

‎            जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती व्हावी आणि महिलांना तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने रविवार, दिनांक ८ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत नगराळे हॉस्पिटल, नांदेपेरा रोड, वणी येथे महिलांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

‎       या शिबिराचे उद्घाटन किरण देरकर अध्यक्ष, सन्मान स्त्रीशक्ती फाउंडेशन आणि संस्थापिका एकविरा पतसंस्था, मारेगाव यांच्या हस्ते होणार आहे.

‎          या आरोग्य शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संचित्ता विजय नगराळे (M.B.B.S., M.D. – Gold Medalist, KEM Mumbai) या महिलांची तपासणी करून सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध समस्या, मासिक पाळीतील अडचणी, गर्भाशयाशी संबंधित आजार याबाबत त्या माहिती देणार आहेत. विशेषतः गर्भाशय कॅन्सर तपासणी तसेच त्यावरील प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबतही महिलांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

‎      याशिवाय आयुर्वेदाचार्य डॉ. सुवर्णा चरपे (BAMS, Dy.AC Pune) यांच्याकडून महिलांचे नाडी परीक्षण करून आयुर्वेदिक उपचारपद्धती, पंचकर्म उपचार तसेच “अंगावर पाणी जाणे” या महिलांमध्ये आढळणाऱ्या गंभीर समस्येबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

‎         महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढावी आणि महिलांनी वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्यावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले. ग्रामीण व शहरी भागातील अनेक महिला आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करतात. अशा महिलांना तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि मोफत तपासणीची सुविधा मिळावी हा या शिबिरामागील मुख्य हेतू आहे.

‎        या शिबिरासाठी इच्छुक महिलांनी पूर्वनोंदणी करावी, असे आयोजकांनी आवाहन केले आहे. नोंदणीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा :

      ‎दवाखाना : ९८८१९६६५४१

     ‎कांचन देसकर : ८८०६६८६७७०

      ‎सुरेखा ढेंगळे : ९५१८३६७२६६

       ‎सविता बावणे : ७०३०८७९५४२

‎           जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad