Type Here to Get Search Results !

वणी येथे मनसेकडून वीर बाबुराव शेडमाके यांची जयंती उत्साहात साजरी ‎

 वणी : 

‎              वीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) तर्फे वणी येथील शिवमुद्रा जनसंपर्क कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

‎    कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील धैर्य, शौर्य आणि देशभक्तीपूर्ण कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्याचा आदर्श समाजाने घ्यावा, असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

      ‎ देशाच्या स्वातंत्र्यासाठी वीर बाबुराव शेडमाके यांनी दिलेले बलिदान आणि त्यांची लढाऊ वृत्ती आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. त्यांच्या विचारांचा प्रसार समाजात व्हावा आणि नव्या पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

‎   या कार्यक्रमाला मनसे वणी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला.

‎     याप्रसंगी फाल्गुन गोहोकार, गोविंदजी थेरे, हरिभाऊ कालेकार, राकेश वैद्य, गौरव बोबडे, प्रवीण कळस्कर, प्रतीक बुरडकर, निखिल गोहने, रितिक ठेंगणे, प्रवीण मांडवकर, सागर चट्टे, वैभव पुरणकार, आशिष घनकासार, नितीन बिंझाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image