Type Here to Get Search Results !

वणीचा राजकीय पट पालटला; दिग्गजांचा शिंदे गटात प्रवेश


वणी :

‎            महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नंदनवन निवास येथे पार पडलेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला.
‎      पक्षप्रवेश करणारे प्रमुख नेते व त्यांची पदे :
‎आशिष खुळसंगे – माजी जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष वसंत जिनिंग वणी, माजी झरी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष
‎दीपक भैया कोकास – उपजिल्हाप्रमुख (उबाठा)
‎गजानन किनेकर – माजी तालुकाप्रमुख, काँग्रेस नेते
‎राजू तुरणकर – माजी नगरसेवक, माजी शहरप्रमुख (उबाठा)
‎अजिंक्य शेंडे – युवासेना उपजिल्हाप्रमुख
‎पंकज मुंडे – माजी नगरसेवक (काँग्रेस)
‎डॉ. मारुती माशेलकर – माजी सरपंच, आडेगाव
‎शंकर पाचभाई – कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक
‎विलास निखाडे – माजी सरपंच, मारेगाव
‎सोमेश्वर गेडेकर – सामाजिक कार्यकर्ता
‎गोपाल खामनकर – स्थानिक कार्यकर्ता (मारेगाव)
‎राजू वनकर – यवतमाळ शहर उपाध्यक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट)
‎प्रदीप कांबळे – सामाजिक कार्यकर्ता
‎नितीन निघोट – शहराध्यक्ष, युवक राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
‎           या सर्वांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश करत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.या पक्षप्रवेशामुळे वणी विधानसभा क्षेत्र तसेच यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेस आणि उबाठा गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. स्थानिक पातळीवरील प्रभावी नेतृत्वातील या बदलामुळे आगामी निवडणुकांमध्ये नव्या समीकरणांची निर्मिती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‎          यावेळी पराग पिंगळे (पश्चिम विदर्भ समन्वयक), हरीहर लिंगणवार (जिल्हा संपर्क प्रमुख), राजुदास जाधव (जिल्हाप्रमुख), सुरेश चिंचोळकर (पश्चिम विदर्भ प्रमुख, आदिवासी विभाग), श्रीधर मोहोड, गजानन ढोमाळे, निलेश बेलोरकर, विशाल कीन्हेकर आणि बाळू चेडे आदी मान्यवर उपस्थित होते.
‎      सोहळ्यादरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नवागतांचे स्वागत करत संघटन अधिक बळकट करण्यावर भर दिला. “विकासकामे आणि जनहिताचा अजेंडा अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले.
‎      या घटनाक्रमामुळे यवतमाळ जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक चुरशीचे होण्याची चिन्हे दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image