Type Here to Get Search Results !

वणीतील जैताई मंदिरात प्राचार्य दिलीप चौधरी यांचे व्याख्यान

‎वणी :

‎               संस्कार भारती समिती, सागरझेप बहुद्देशीय संस्था व जैताई मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने भारत माता पूजन तसेच स्व. माधव सरपटवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक भव्य, प्रेरणादायी व वैचारिक प्रबोधन करणाऱ्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रेरणादायी विचार पोहोचविण्याच्या उद्देशाने हे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
‎             हा कार्यक्रम दि. ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता जैताई मंदिर परिसरात संपन्न होणार असून, चंद्रपूर येथील सुप्रसिद्ध व अभ्यासू वक्ते प्राचार्य दिलीप चौधरी हे “राष्ट्रहितासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य” या अत्यंत महत्त्वाच्या व समकालीन विषयावर सखोल मार्गदर्शन करणार आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजसुधारणा, शिक्षणाचा प्रसार व समतेचा संदेश देत राष्ट्रनिर्मितीसाठी केलेले कार्य आजच्या पिढीसाठी किती मार्गदर्शक आहे, याचा उलगडा या व्याख्यानातून होणार आहे.
‎            कार्यक्रमादरम्यान वक्तृत्व स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, रोख बक्षीस व सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच समाजात वैचारिक चळवळीला चालना मिळेल, असा आयोजकांचा विश्वास आहे.
‎           वणी शहरातील सर्व नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, पालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी या वैचारिक मेजवानीचा लाभ घ्यावा, राष्ट्रभक्ती व सामाजिक जाणीव वृद्धिंगत करणाऱ्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे तसेच श्रोत्यांनी वेळेचे भान राखून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image