Type Here to Get Search Results !

“माझ्या नादाला लागलीस तर जिवंत सोडणार नाही!” — धमकीनंतर लोखंडी रॉडचा वार

 

वणी : 

‎            तालुक्यातील राजुर कॉलरी परिसरात महिलांवरील अत्याचाराचा अत्यंत गंभीर व संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. वैयक्तिक वादातून एका महिलेला लोखंडी रॉडने अमानुष मारहाण करण्यात आली असून, या हल्ल्यात ती महिला गंभीर जखमी झाली आहे.

‎        पीडित महिला मजुरीचे काम करणारी असून, मागील काही काळापासून ती संबंधित पुरुषापासून वेगळी राहत होती. मात्र, याआधीही तिला वारंवार धमकावणे, मारहाण करणे व मानसिक छळ केल्याच्या तक्रारी नोंदविल्या गेल्या होत्या.

‎           दि. १५ जानेवारी २०२६ रोजी दुपारच्या सुमारास संबंधित पुरुषाने थेट पीडितेच्या घरी जाऊन वाद घातला. यावेळी मोबाईल फोडून टाकत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास पीडित महिला घटनेची माहिती देण्यासाठी नातेवाईकांकडे गेली असता, तेथेच पुन्हा तिच्यावर लोखंडी रॉडने डोक्यावर व डाव्या हातावर हल्ला करण्यात आला.

‎       या हल्ल्यात महिलेला गंभीर दुखापत झाली असून, तिला तातडीने ग्रामीण रुग्णालय, वणी येथे दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत तिचा डावा हात फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

‎     घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित पुरुषाविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत ‎कलम 351(3), 351(2) व 118(2) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad