Type Here to Get Search Results !

घरातून निघाली, पण घरी परतली नाही, अल्पवयीन मुलगी बेपत्ता

वणी :

‎           शहरातील परिसरातून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या बेपत्ता होण्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सदर मुलगी ही नेहमीप्रमाणे महाविद्यालयात जात असल्याचे सांगून घरातून निघाली; मात्र सायंकाळपर्यंत घरी परतली नाही. कुटुंबीयांनी परिसरात, नातेवाईक व ओळखीच्या ठिकाणी कसून शोध घेतला असता ती कुठेही मिळून आली नाही.


       ‎पीडित मुलीची यापूर्वी एका युवकासोबत ओळख असल्याची माहिती असून, याबाबत कुटुंबीयांनी त्या युवकास समजही दिली होती. मात्र सदर युवकाने मुलगी अल्पवयीन असल्याची पूर्ण जाणीव असूनही तिच्या अज्ञानाचा फायदा घेत फूस लावून पळवून नेल्याचा गंभीर संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.


       ‎या प्रकरणी मुलीच्या आईने वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 137(2) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


        ‎अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवावीत व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये तीव्र चिंता व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad