Type Here to Get Search Results !

आभाळ कोसळलं, पण सरकार उभं राहिलं — शेतकऱ्यांसाठी इतिहास रचला महायुतीने!

वणी – 

            राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने तब्बल ३१,६२८ कोटी रुपयांचे ऐतिहासिक मदत पॅकेज जाहीर केले आहे. ही राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी आर्थिक मदत असून, यवतमाळ जिल्ह्यातील वणी, झरी-जामनी आणि मारेगाव तालुक्यांतील शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी वणी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

           बोदकुरवार म्हणाले, “अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे आहे. मदतीचा विस्तार ३ हेक्टरपर्यंत करण्यात आला असून ६५ मिमी पावसाची अट रद्द करण्यात आली आहे.”


 📌 मदतीचे तपशील :

  • कोरडवाहू शेतकरी: ₹१८,५०० प्रती हेक्टर
  • हंगामी बागायती: ₹२७,००० प्रती हेक्टर
  • बागायती शेतकरी: ₹३२,५०० प्रती हेक्टर
  • पिकविमा धारकांना: ₹१७,००० प्रती हेक्टर अतिरिक्त मदत
  • जमीन खरडून गेलेली: ₹४७,००० प्रती हेक्टर + नरेगामधून ₹३ लाख


 📌 पशुधन आणि वैयक्तिक नुकसानीसाठीही मदत :

          दुधाळ जनावरास ₹३७,५००, ओढकाम जनावरास ₹३२,०००, शेळी/मेंढी ₹४,०००, तर मृत व्यक्तींच्या वारसांना ₹४ लाख मदत देण्यात येईल.


📌 अतिरिक्त सुविधा :

                         कर्जवसुली स्थगिती, वीजबिल माफी, महसूल सुट, परीक्षा शुल्क माफी, तसेच विहिरीतील गाळ काढण्यासाठी ₹३०,००० अनुदान देण्यात येईल.

           यावेळी माजी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, माजी जिल्हाध्यक्ष तारेंन्द बोर्डे, महादेव खाडे, दिनकर पावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, जिल्हा उपाध्यक्ष रवी बेलुरकर, शहर अध्यक्ष ॲड. निलेश चौधरी यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

           यावेळी “धन्यवाद देवाभाऊ, धन्यवाद महायुती सरकार!” अशा घोषणा देण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या