वणी :–
“प्रत्येक हाताला काम, प्रत्येक शेताला पाणी” हा पं. दीनदयाल उपाध्यायांचा नारा भारताला पुन्हा विश्वगुरु बनविण्याचा मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य गजानन कासावार यांनी केले.
मारेगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
📌 कासावार यांचे प्रतिपादन :-
कासावार यांनी आपल्या भाषणात एकात्म मानव दर्शन विषद करताना सांगितले की,
“शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यांचा समन्वय साधणे म्हणजेच खरे सुख. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांचा संतुलित उपभोग हा भारतीय जीवनदर्शनाचा गाभा आहे.”
त्यांनी स्पष्ट केले की, 1965 मध्ये विजयवाडा अधिवेशनात जनसंघाने एकात्म मानव दर्शन सिद्धांत आणि नीती म्हणून स्विकारले होते. त्यानंतर मुंबई येथे पं. दीनदयालजींनी दिलेली चार ऐतिहासिक व्याख्याने या विचारांचा पाया ठरली.
📌 अध्यक्षीय उद्बोधन :-
अध्यक्षस्थानावरून बोलताना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सहयोगी प्राचार्य राजेश ढबाले म्हणाले,
“पं. दीनदयाल उपाध्यायांचे विचार हे युवकांसाठी दीपस्तंभ आहेत. जीवनात या विचारांचे अनुकरण करणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल.”
📌 प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे वैशिष्ट्य :-
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विस्तारक वैभव वाघमारे, शिल्प निदेशिका सुनिता उईके आणि शिल्प निदेशक चंद्रशेखर वासनिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रीना पेंढारकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मोहन पायघण यांनी केले.
📌 युवकांसाठी प्रेरणादायी संदेश :-
या कार्यक्रमातून पं. दीनदयाल उपाध्यायांचे विचार युवकांपर्यंत पोहोचले आणि समाज व राष्ट्राच्या उभारणीत प्रत्येक युवकाने आपली भूमिका निभावावी, असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.


.jpg)


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या