वणी :
श्रद्धेय पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती हा केवळ स्मरणाचा दिवस नसून त्यांच्या एकात्म मानववादाच्या तत्त्वज्ञानाला कार्यात उतरवण्याचा संकल्प घेण्याचा क्षण आहे, असे प्रतिपादन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. वणी येथे झालेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
🗣️“समाजातील शेवटच्या घटकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याची ताकद आपल्या कार्यात असली पाहिजे. खरी प्रगती ही आकडेवारीत नव्हे तर शेवटच्या घटकाच्या उन्नतीत मोजली जाते. राजकारण म्हणजे सत्ता नव्हे तर मूल्यांची साधना आहे,” असे ते म्हणाले.
🔑 मेळाव्याची ठळक वैशिष्ट्ये :-
भाजप ही केवळ संघटना नाही, तर एक विचारधारा आहे. काळ बदलतो, परिस्थिती बदलते; पण पक्षाचे मूल्य व तत्त्वे शाश्वत राहतात, असे आमदार मुनगंटीवार यांनी अधोरेखित केले.
माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा वाढदिवस विशेष कौतुकासह साजरा करत त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन ‘वणी नगरपरिषद जिंकणारच’ या ध्येयासाठी कार्यकर्त्यांना सज्ज होण्याचे आवाहन.
जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची हमी – “वणी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक प्रश्न सभागृहात मांडला जाईल, जनतेच्या हिताचे प्रत्येक काम प्राधान्याने केले जाईल.”
👥 प्रमुख उपस्थिती :-
पालकमंत्री अशोक उईके, माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, ललिता बोदकुरवार, माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, दिनकर पावडे, विजय पिदुरकर, संजय पिंपळशेंडे, रवि बेलूरकर, कुणाल चोरडीया, संतोष डंभारे, श्रीकांत पोटदुखे यांच्यासह कार्यकर्ते व संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्तावना व सूत्रसंचालन शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या