Type Here to Get Search Results !

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती संयुक्तपणे रवी नगर लायन्स स्कूल येथे साजरी

वणी : 

       रवी नगर येथील लायन्स इंग्लिश मिडियम स्कूल येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती शुक्रवार दि. ०१ ऑगस्टला मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी महापुरूषांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व अकॅडेमीक डायरेक्टर प्रशांत गोडे तर प्रमुख अतिथीस्थानी शिक्षिका मनीषा कापसे आणि वर्षा डांगे मंचावर उपस्थित होते.

     विद्यार्थ्यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर उत्स्फूर्त भाषणे दिली. यांनतर लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग लघुनाटिकेतून व पोवाड्यातून विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे सादर केले. 

          याप्रसंगी प्रियांश मारोटकर या विद्यार्थ्यांने लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्रातून इंग्रजांबद्दलचा असंतोष भारतीय जनतेच्या मनात पसरवला आणि स्वातंत्र्यलढ्याच्या काळात भारतीयांना एकत्र करून स्वातंत्र्याची रणनीती बनवण्यासाठी टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. यांसारख्या प्रसंगातून लोकमान्य टिळकांचे जीवनचरित्र विद्यार्थ्यांसमोर उभे केले. तसेच अभीर सरमुकदम या विद्यार्थ्याने पोवाडा सादर करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील  विविध व्यक्तीरेखांचा परीचय करून दिला.

       समाजासाठी प्रेरणादायी असणारे अण्णाभाऊ साठे यांचे विचार तसेच अतिशय खडतर परिस्थितीमध्ये अण्णाभाऊ साठेंची जडणघडण आणि लोकमान्य टिळकांनी समाजात सामजिक क्रांती कशी निर्माण केली ? याविषयी प्राचार्य व अकॅडेमीक डायरेक्टर प्रशांत गोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच अगदी दीड दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ साठे यांनी दैदिप्यमान साहित्य कसे निर्माण केले ? तसेच त्यांच्या लिखाणातून दलित, कामकरी, कष्टकरी, बहुजन वर्गाचे त्यांनी मांडलेले प्रश्न आणि लोकमान्य टिळकांची चतुः सुत्री स्वराज्य मिळविण्यासाठी किती महत्त्वाची होती, हे शिक्षिका मनीषा कापसे यांनी त्यांच्या मनोगतातून विद्यार्थांना सांगितले.

         लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित लघुनाटीका प्रियांश मारोटकर, नैतिक डुमणे, खुशी वानखडे, दक्ष बोंडे, देवांश जुंगरी, सार्थक जयवंत, अल्तमस खान या विद्यार्थ्यांनी सादर केली. या लघुनाटीकेचे मार्गदर्शन शिक्षिका वैशाली पिसे, प्रीती बघेले, भारती वानखडे, सपना राजुरकर यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  या कार्यक्रमाचे संचालन कु. स्वरा उईके, कु. गोजिरी बोधाने तर उपस्थितांचे आभार कु. गोजिरी बोधाने यांनी मानले. 

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image