Type Here to Get Search Results !

रवी नगर परिसरात अवैधरित्या रेती वाहतूक, पोलिसांची मोठी कारवाई

वणी : 

            दिनांक 25/07/2025 रोजी रविनगर या भागात पोलीस रात्री पेट्रोलींग करीत असतांना एक हायवा ट्रक MH 34 BG 1596 या मध्ये अवैधरीत्या रेती (गौण खनिज) वाहून नेत असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यांनी टिप्पर ला थांबवुन पाहणी केली असता त्यामध्ये 7 ब्रास रेती (गौण खनिज) दिसुन आली.  पोलिसांनी टिप्पर व टिप्पर मधील रेती (गौण खनिज) संदर्भात कागदपत्रांची पडताळणी केली असता रेती वाहतुकीबाबत अधिकृत परवाना मिळून आला नाही. तसेच चालक कडे रेती बाबत परवाना मागितला तेव्हा चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. सदर रेती चोरट्या मार्गाने वाहतूक होत असल्याची खात्रीवरून पोलिसांनी रेती भरलेला ट्रक पोलीस स्टेशन येथे लावला. 

       टाटा कंपणीचा टिप्पर क्र. MH 34 BG 1596 किंमत 25,00,000/- व रेती किंमत 42,000/- असा एकूण 25,42,000/- रु चे मु‌द्देमालासह जप्त केला. तसेच ट्रक चालक मुशीर खान रशीद खान पठाण वय 29 वर्ष रा. बल्लारशा, जि. चंद्रपुर यांच्यावर कलम 303(2) भा.न्या.सं. सह कलम 48(8) जमीन महसूल कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

        सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या आदेशानुसार पो. का. श्याम राठोड, पो. का. भानुदास हेपट, पो. का. नंदकुमार पुप्पुलवार, पो. का. अरविंद बच्चे, आणि पो. का. राहुल बोंडे यांनी पार पाडली. 

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image