Type Here to Get Search Results !

उद्या उद्धव ठाकरेंची तोफ वणीत धडाडणार, विरोधकांचा घेणार खरपूस समाचार

वणी, शुभम कडू :

                     महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारांच्या प्रचारासाठी राजकीय नेत्यांचे प्रचार सभा घेण्यासाठी सुरुवात झाली आहेत. वणी विधानसभा ही महाविकास आघाडीमधील शिवसेना उध्दव ठाकरे गट यांच्या वाट्याला गेली. यामध्ये शिवसेना (उबाठा) गटाच्या संजय देरकर यांना उमेदवारी मिळाली आहेत. 

      संजय देरकर हे वणी विधानसभेमधील अतिशय लोकप्रिय नेते आहेत. तसेच त्यांची वणी शहरासह, तालुक्यातील गावामध्ये खूप चांगली पकड आहेत. संजय देरकर यांनी शक्तिप्रदर्शन करित उमेदवारी अर्ज दाखल करुन प्रचाराचा झंझावात सुरू आहेत. यामध्ये गावोगावी भेटी देत असून प्रत्येक कुटुंबाच्या घरी जाऊन भेटी देत महाविकास आघाडीला विजयी करून उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करण्याऱ्या सरकारला पाडायचे आहेत. त्यासाठी वणी विधानसभेत मशाल या चिन्हाला मतदान करून संजय देरकर यांना विजयी करा असे आवाहन करण्यात येत आहे. 

          महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सोमवारला दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता शासकीय मैदानावर भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेमधून उद्धव ठाकरे विरोधकांचा खरपूस समाचार घेणार आहेत. या सभेमुळे विधानसभा क्षेत्रातील लोकांमध्ये उत्साह संचारला असून कार्यकर्ते कामी लागले आहेत. ही सभा यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर आणि शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख नेते सुनील कातकडे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad