विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेने मध्ये जोरदार इनकमिंग चालुआहे. याचाच एक अंक आज पार पडत मारेगाव तालुक्यातील रामपूर येथील सरपंच राम मेश्राम यांनी आपल्या समर्थकांसह मनसेचे उमेदवार राजू उंबरकर यांच्या उपस्थित आज महाराष्ट्र नवनिर्माण सेने मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. निवडणूका जाहीर होताच अनेक उलथापालथं घडत गेल्या, यात अनेक सामाजिक संघटनांनी आणि राजकिय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्ष प्रवेश केला. याचाच फायदा या निवडणूकीत मनसेला होणार आहे. पक्ष संघटनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभेत मजबूत आहे. तर कार्यकर्त्याचे सर्वत्र जाळे आहे. तर राजू उंबरकर यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याची जमापूंजी पक्षाकडे आहे. याचा फायदा या निवडणूकीत पक्षाला होणारं हे नक्की.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, तालुकाध्यक्ष रुपेश ढोके, नागेश रायपुरे, उज्वला चंदनखेडे, शुभम भोयर, चांद बहादे, अनंता जुमडे, रोशन शिंदे, सूरज नागोसे, उदय खिरटकर, यांच्या सह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या