Type Here to Get Search Results !

द ग्रेट पिपल्स ग्रुप तर्फे विद्यालयात भारताचे संविधान उद्येशिका वाटप करून संविधान दिन साजरा!

वणी, शुभम कडू : 

                     26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान भारतीय जनतेला समर्पित करण्यात आले. हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे, जे प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यास सक्षम आहे. देशाचा मूलभूत कायदा असल्याने सर्व ग्रंथांमध्ये राज्यघटना सर्वोच्च आहे. याच दिनाचे औचित्य साधत  ''द ग्रेट पिपल्स ग्रुप'' च्या वतीने दरवर्षी संविधान दिनी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतात. यावेळेला संविधानदिनी प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम आणि संविधानाविषयी जनजागृती निर्माण होण्यासाठी, संविधानाच्या प्रसाराचे कार्य सुरु ठेवणे हा हेतू समोर ठेवत वणी शहरातील जनता विद्यालय, विवेकानंद विद्यालय, लोकमान्य टिळक महाविद्यालय, आदर्श कनिष्ठ विद्यालय, नुसाबाई चोपणे विद्यालय, शिक्षण प्रसारक मंडळ महाविद्यालय येथे द ग्रेट पिपल्स ग्रुप तर्फे भारतीय संविधान उद्देशिका भेट देऊन साजरा केला.  यावेळी दत्ता डोहे, प्रीतम बागडे, दिनेश रायपूरे, शुभम कडू यांनी विद्यालयातील प्राचार्य आणि विद्यार्थी यांना भारताचे संविधान उद्देशिका भेट देत संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

       संविधान स्वीकारल्याच्या तारखेच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यात आला असला तरी, त्याच्या अंमलबजावणीपूर्वी दोन महिने त्याच्या प्रत्येक तपशिलावर नजर ठेवण्यात आली होती. यावेळी राज्यघटनेचे संपूर्ण वाचन करण्यात आले आणि त्यानंतर त्याचे इंग्रजीतून हिंदीत भाषांतर करण्यात आले. आम्ही तुम्हाला सांगतो की भारताचे संविधान दोन वर्षे, 11 महिने आणि 18 दिवसांत तयार करण्यात आले होते.

              संविधान सभेच्या सदस्यांनी 24 जानेवारी 1950 रोजी संविधानाच्या दोन हस्तलिखित प्रतींवर (हिंदी आणि इंग्रजी) स्वाक्षरी केली. दोन दिवसांनंतर, 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना देशाचा कायदा म्हणून अंमलात आली. तसेच इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत प्रजासत्ताक बनला. मात्र, राज्यघटना लागू होण्यापूर्वी त्यात ठरलेल्या कायद्यांवर बरीच चर्चा झाली. या चर्चेत भाषा, हक्क आणि अल्पसंख्याकांच्या मुद्द्यांचा समावेश करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad