Type Here to Get Search Results !

कॉ. अनिल हेपट यांचे समर्थनार्थ AIYF ने वणी, मारेगाव, झरी शहरात बाईक रॅली

वणी :
         भाकपचे उमेदवार कॉ.अनिल हेपट यांनी दोनदा संपुर्ण मतदारसंघ पिंजुन काढत तिसरया फेरीला परवापासुन सुरूवात केली. 3 दिवसात 100 गावात भेटी दिल्या. ग्रामीण भागातील प्रचंड प्रतिसाद बघता आता वणी शहरातील शेकडो युवकांनी आॅल इंडिया युथ फेडरेशनच्या नेत्रुत्वात कॉ. अनिल हेपट यांचे समर्थनार्थ काल शिवाजी महाराज चौकातुन प्रचंड बाईक रॅली काढली.

         या रॅलीत उमेदवार कॉ.अनिल हेपट, अनिल घाटे, शाम काळे, प्रा.यूगल रायलु, दिलीप तायडे, गजानन घोडे(नागपूर), तुकाराम भस्मे, निळकंठ ढोके, नेतनराम (अमरावती), अरूण रेणके(उस्मानाबाद), मौला मुल्ला (कर्नाटक), हिम्मत पाटमासे, दिवाकर नागपुरे, विजय ठाकरे (यवतमाळ), प्रविण आडे (राळेगाव), बंडु गोलर, राहुल रामटेके, गणेश कळसकर (मारेगाव), राजु पेंदोर (झरी), मारोती काळे, अनिकेत काळे, सौ.बिना हेपट हे नेतेमंडळी सहभागी झालेत.

       कॉ. अनिल हेपट यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून युथ फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष राकेश खामणकर व स्टडंटस् फेडरेशन चे जिल्हाध्यक्ष अथर्व निवडिंग यांचे नेत्रुत्वात ढोल ताशासहीत शहरात प्रचंड बाईक रॅली काढली. रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधल्या गेले. विळा उंबईला शहराने प्रतिसाद देऊन उमेदवाराला घराघरातुन 'लाल सलाम'करीत विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

     रॅली शहराच्या मुख्य रस्त्याने फिरून मारेगाव शहराकडे मार्गक्रमण झाली. वाटेत चिखलगाव व राजुर फाट्यावर वेकोली आयटक युनियन कामगारांनी रॅलीचे भव्य स्वागत केले. मारेगाव शहरात रॅली फिरून जनतेचा आशिर्वाद घेतला त्यानंतर बाईक रॅली झरी शहरात सायंकाळी पोहोचली. झरी येथे नागरिकांनी उमेदवाराचे भव्य स्वागत केले. कालच्या रॅलीने विळा उंबईची बाजु भक्कम झाली.दुसरीकडे महागाव, मुकुटबन, हनुमाननगर, कायर, मार्कि, अर्धवनसहीत अन्य गावातील कार्यकर्त्यांनी तिथेही प्रचार सभा घेतल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad